Pages

नमस्कार, मी श्री मोरबाळे एस. व्ही. (एम.एस्सी.बी.एड.) मो.नं.8623039822 . आपण माझ्या ब्लॉगला सदिच्छा भेट दिला, त्याबद्दल आपले सदैव आभारी आहोत....

माझ्या कविता

          👉  प्रतिक्षा 👈

जीवनाची वाट चालत असताना,
निरास होऊनी जाऊ नकोस.
जे ओढतात त्यांना ओढू दे
त्यांच्या मागे धावू नकोस. निरास होऊनी पाहू नकोस
         दगडालाही कधीतरी पाझर फुटेल,
         तो बघ दुर्वा, इतर वेळी पायाखाली रगडणारा
         संकष्टीच्या वेळी, गणपतीच्या माथ्यावर,
         दिमाखदारपणे वाहिला जातो.
मग, तू तर माणूस आहेस.
वेळ येईल तेव्हा, तुझाही
तेवढ्याच ताकतीने, स्वीकार होईल.
जे पुढे आहे, त्याचा स्वीकार कर.
जे हिरावून घेतात, त्यांचा विचार नको.
          निरास होऊन, जीवन जगू नकोस.
         पण, ती वेळ येईपर्यंत.
         सर्व त्रास निमूटपणे गिळंकृत कर.
        अन् त्या वेळेची, त्या दिवसाची.
        प्रतीक्षा कर.


2 comments: